तुला ऐकू येईल ना...
जरा दूर कोठेतरी , तुला ऐकू येईल ना,
तुटे आत काहीतरी ,की आवाज होईल ना
फिरे आज वार्यावरी,सुना श्वास माझा इथे,
तुझा दूर श्वासातला ,जरा वेग वाढेल ना
मला सांग माझे तुझे,खरे काय नाते असे,
तुझा एक ठोका तरी ,असा प्रश्न पडेल ना
किती दूर चालू असा ,तुझा शोध घेऊ कुठे,
तुज्या पावलला सुधा ,जरा धूळ लागेल ना
तुझा स्पर्श होतो मला,कसा कोण जाणे इथे,
तुला ओढ माझी कधी,असा स्पर्श देईल ना..
राधा (धारा)
अमृता सामंत
२०१०
No comments:
Post a Comment