पुन्हा पावसाला जरा जोर आला,
तुला पाहुनी श्वास गंभीर झाला
किती चेह्रयाला निराकार ठेवू ,
उभ्या आरशाला दुरावा कळाला
पुन्हा वाटले की तुझे नाव घ्यावे
मी उच्चार केला नि पाउस आला
कुठे रोज होता इथे पावसाळा
जुना मेघ आला नि भावुक झाला
नभाला मनातून समजावले मी ,
जरा धीर दे आजच्या पावसाला
राधा (धारा)
अमृता सामंत
२०१०
No comments:
Post a Comment